जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के साखर कारखान्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडं कानाडोळा

shivrajya patra

श्री सिद्धेश्वर, लोकमंगल आणि सिद्धनाथ यासह जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांचा समावेश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के साखर कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडं कानाडोळा केल्याचं दिसून आलंय. त्यात श्री सिद्धेश्वर, लोकमंगल आणि सिद्धनाथ यासह जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना ऊस दर जाहीर करण्यासंबंधी सुचित केले होते, त्यास प्रतिसाद म्हणून 19 साखर कारखान्यांनी लेखी व तोंडी स्वरूपात ऊस दर जाहीर केलेला आहे.

ऊस दर जाहिर न केलेल्या 15 कारखान्यांशी संपर्क सुरु आहे. त्यांनी तात्काळ ऊस दर जाहिर करावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. संबंधित कारखान्यांनी ऊस दर जाहिर न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, याची संबंधित कारखान्यांना कल्पना देण्यात आल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलंय.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर न करतांच गाळप हंगाम सुरु केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. 

या तक्रारींची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गंभीर दखल घेऊन साखर कारखानदार यांच्या समवेत 14 व 17 नोव्हेंबर रोजी बैठक घेतली. त्यावेळी 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. 

To Top