सोलापूर : येथील मुस्लिम पाच्छा पेठ परिसरातील महानगरपालिका उर्दू शाळा नं. 09 मध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. फेस्टिवलचे उद्घाटन रफीक खान यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे स्कूल बोर्डाचे माजी पर्यवेक्षक रफीक खान, माजी केंद्र प्रमुख मौलाअली लोकापल्ली, माजी शिक्षक शफीक खान, इम्रान पठाण उपस्थित होते. 
प्रारंभी फजल शेख यांनी प्रास्ताविकात फुड फेस्टिवलचे महत्त्व विषद केले. प्रभारी मुख्याध्यापिका मैंदर्गी फहमिदा यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचे सत्कार करण्यात आला. 
शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवून आणलेले खाद्य पदार्थ गुलाब जामून, कद्दूखीर, वडापाव, द्वाशी, इटली, बिर्याणी, खिचडा इत्यादींचा सर्व पाहुणे, पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी या फेस्टीव्हलमधील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. 
अफसाना शेख, सना जमखंडी, शबाना कुरेशी यासह सर्व शिक्षकांच्या परिश्रमामुळं हा फुड फेस्टिव्हल यशस्वीरित्या पार पडला.
