वडा-पाव विक्री हातगाडीवर बालकामगार; गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर :  वडा-पाव हातगाडीवरील वडा-पाव विक्रीत बालकास कामाला ठेऊन त्यास  अनावश्यक शारीरीक व मानसिक कष्ट दिल्याप्रकरणी रामरेज उमेरसिंग राजपूत याच्याविरूद्ध बालकामगार कायदा, अल्पवयीन मुलांचे कायदा आणि संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सोलापुरातील सात रस्ता परिसरात चालणाऱ्या वडापाव हातगाडीवर 14 वर्षे 09 महिने वयाच्या बालकास वडापाव विक्रीबरोबर शारिरीक व मानसिक छळ झाला असल्याची फिर्याद रजनीगंधा संदिप गायकवाड यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केली, त्यानुसार रामरेज रजपूत याच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

त्या बालकाच्या हातून गैरकृत्य व काम करुन घेऊन त्याची पिळवणूक केली, तक्रारदाराचा आरोप आहे. पोलीस हवालदार जमादार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top