सोलापूर : 'जगाला एकेश्वरवादाची शिकवण देणारे , मानवाबरोबर प्राणी आणि सृष्टीतील प्रत्येक घटकांवर प्रेम करा, गरजवंताना दान करा' अशी कल्याणकारी शिकवण देणारे शिख धर्माचे संस्थापक गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने अंत्रोळीकर नगर येथील गुरूद्वारात गुरुग्रंथास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले, सौरभ भांड, माजी नगरसेवक हारुण शेख यांच्यासह छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

