विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; समता सैनिक दलाचा उपक्रम

shivrajya patra

सोलापूर : समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आणि पोलीस उपनिरीक्षक केरू रामचंद्र जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन या निमित्ताने हनुमान नगरातील विकास विद्यालय आणि सो.म.न.पा. प्राथमिक शाळा क्रमांक 16 आणि 21 या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे जीओसी सुमित्रा केरू जाधव, ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, महासचिव अनिल जगझाप, भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मरक्षिता कांबळे,मालिनी दोड्यानुर, लता कांबळे, वर्षा जाधव, प्रीती जाधव, विनोद जाधव तसेच शाळेतील शिक्षक राहुल पवार, शंकर नरहरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आपण हेही वाचू  शकता !

पायी निघालेला लाँग मार्च- जवळपास 110 K.M. चं तोडलं अंतर; दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

https://www.shivrajyapatra.co.in/2025/11/110-km.html

◽ 

https://dhunt.in/12qr66

By Shivrajya Patra

पोलीस उपनिरीक्षक केरु रामचंद्र जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त येणाऱ्या मान्यवरांना आवाहन करण्यात आले होते की, आपण पुष्पगुच्छ, बुके-हारतुरे न आणता वही आणि पेन घेऊन यावे. त्यानुसार या कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या वह्या आणि पेन याचे वाटप यावेळी करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव अनिल जगझाप यांनी केले, सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले तर सिद्धेश्वर भुरले यांनी सर्वांचे आभार मानले.

To Top