छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचच्या प्रदेश अध्यक्षपदी इलीयास शेख

shivrajya patra

पुणे : बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे कार्यरत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पुणे येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवश्री इलीयास महिबूब शेख यांची छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत बंधु यांचे १३ वे वंशज शिवश्री राजे फतेसिंह (बाबासाहेब भोसले) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना हे पद प्रदान करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील काजी हैदर यांचे १३ वे वंशज शिवश्री सोहेल शेख यांच्या वतीने पुणे येथे सामाजिक बांधिलकी मिलन समारोह या कार्यक्रमाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक बांधिलकी मिलन समारोह सोहलयाद्वारे  विविध समाज घटकांमधील ऐक्य, एकात्मता आणि सामाजिक बांधीलकीचा संदेश देण्यात आला. 

सुमारे ४०० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचच्या प्रयत्नाने शिवरायांचे घराणे व काजी हैदर या दोन घराण्यांचे मिलन झाले. या मिळणातून पुनः एकदा शिवरायांच्या विचारांचा जागर सर्व सामान्यांपर्यंत पोहचला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत बंधु यांचे १३ वे वंशज शिवश्री राजे फतेसिंह (बाबासाहेब भोसले) हे विराजमान होते. 

या सामाजिक बांधिलकी मिलन सोहळ्यात अनेक मान्यवर तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम  विचार मंचचे अध्यक्ष शिवश्री मुजफ्फर सय्यद तसेच उपाध्यक्ष शिवश्री दिनेश माटे मंचचे सहसचिव शिवश्री लियाकत कालसेकर उपस्थित होते.

शिवरायांचे वकील असणाऱ्या काजी हैदर यांना महाराजांनी दिलेली सनद व अनेक दस्तऐवज तसेच त्या काळाची दुर्मिळ शस्त्रे उपस्थितांना पाहावयास मिळाली. सामाजिक बांधिलकी मिलन समारोहाचे शिवश्री सोहेल शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते व शाहीथाटात राजे फतेसिंह भोसले यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम  विचार मंचचे अध्यक्ष शिवश्री मुजफ्फर सय्यद, काजी हैदर यांचे १३ वे वंशज शिवश्री सोहेल शेख तसेच शिवरायांचे चुलत बंधु यांचे १३ वे वंशज शिवश्री राजे फतेसिंह भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुमारे ३ तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री इलीयास शेख यांनी उत्तमरित्या केले. 

To Top