सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या ‘120 बहादुर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे आणि त्याची सुरुवात होते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजातून त्यांचा खोल, प्रभावी आणि प्रेरणादायी आवाज ट्रेलरला एक सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करतो — जो साहस, बलिदान आणि निःस्वार्थ वीरतेची कहाणी अधिक रोमांचक बनवतो.
पहिल्याच फ्रेमपासून ट्रेलर आपल्या भव्य दृश्यांमुळे आणि मिशनमुळे प्रेक्षकांना बांधून ठेवतो. ट्रांझिशन अप्रतिम आहेत, पार्श्वसंगीत गगनभेदी आहे आणि भावना अंत:करणाला स्पर्श करणाऱ्या आहेत — ज्यामुळे हा फक्त ट्रेलर राहत नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
इंडस्ट्री आणि चाहत्यांना आश्चर्यचकित करत, एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांनी ‘120 बहादुर’चा ग्रँड ट्रेलर लॉन्च केला आहे, जो रॉकिंग स्टार यश यांनी एका हृदयस्पर्शी नोटसह सादर केला आहे. मेकर्सनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर लिहिले आहे —
“एका सत्य घटनेवर आधारित, ज्याने आपल्या देशाचा इतिहास घडवला — 120 बहादुरचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. #120Bahadur #EkSauBeesBahadur
स्पेशल थॅंक्स: श्री. @amitabhbachchan सर.”
https://www.instagram.com/stories/thenameisyash/3759759192602152070?utm_source=ig_story_item_share&igsh=MXZ5em0zMno4dmFraw==
ट्रेलर आपल्याला रेझांग ला च्या लढाईची रोमांचक झलक दाखवतो — तो ऐतिहासिक क्षण, जेव्हा चार्ली कंपनीतील 120 सैनिकांनी तब्बल 3000 शत्रू सैनिकांसमोर शौर्याने उभे राहून इतिहास घडवला. या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित ट्रेलर आपल्या भव्यतेने आणि भावनिक शक्तीने मंत्रमुग्ध करतो. प्रत्येक फ्रेम प्रभावी आणि विशाल वाटतो, ज्यात युद्धाची तीव्रता आणि बलिदानाची आत्मा ठळकपणे दिसते. फरहान अख्तर मेजर शैतानसिंह भाटी, PVC म्हणून प्रत्येक फ्रेममध्ये आपल्या अभिनयाची खोली आणि पकड दाखवतात.
चित्रपटात राशी खन्ना, स्पर्श वालिया, विवान भटेना, धनवीर सिंह, दिग्विजय प्रताप, साहिब वर्मा, अंकित सिवाच, देवेंद्र अहिरवार, आशुतोष शुक्ला, बृजेश करनवाल, अतुल सिंह आणि वरिष्ठ अधिकारी अजिंक्य देव व एजाझ खान यांच्याही भूमिका आहेत — ज्यांनी या युद्धकथेची प्रामाणिकता आणि भावनिक गहिराई अधिक वाढवली आहे. भव्य दृश्य, अफाट स्केल आणि तीव्र भावना यांच्या संगमामुळे हा चित्रपट एक खरा सिनेमॅटिक सोहळा बनतो — जो वीरता, बलिदान आणि अढळ देशभक्तीची भावना संपूर्णपणे अनुभवायला लावतो.
दिग्दर्शक रजनीश ‘रेझी’ घई यांच्या दिग्दर्शनाखाली, आणि रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) व अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांच्या निर्मितीत साकारलेला ‘120 बहादुर’ चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
https://youtu.be/r4HusFmN4uw?si=IAMFTJWj8gjE1Zyz
