24 तासात गुन्हा उघडकीस ... ! महिलेच्या ताब्यातून 03 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

shivrajya patra
सोलापूर : चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आलंय. या गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेनं गुन्ह्याची कबुली दिल्यावर आरोपीकडून 02 तोळे सोने अन् 80 हजार रूपयांची रोकड असा 03 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलं आहे. आस्मा परविन आरिफ असं महिलेचं नांव असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

जेलरोड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोहेकॉ/44 अब्दुल वहाब शेख यांना 24 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या खबरीनुसार 23 नोव्हेंबर रोजी घडलेल्या दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम एका महिलेकडं असल्याचं समजलं होतं. त्या खात्रीशीर बातमीवरुन शास्त्री नगरातील रहिवासी असलेल्या महिलेस जेलरोड पोलीस ठाणेकडील महिला अंमलदार म.पो.हे.कॉ. अनुराधा गुत्तीकोंडा यांच्या मार्फतीने पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन चौकशी करण्यात आली.

प्रारंभी तिनं प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली, तिला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने घराच्या उघड्या दारातून प्रवेश करून एका घरातून सोने व पैशाची चोरी केल्याची कबुली दिली. आस्मा परविन आरिफ (वय- 40 वर्षे) असं तिचं नांव आहे. तिच्या ताब्यातून 02 तोळे सोने आणि 80 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हा गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मपोहेकॉ अनुराधा गुत्तीकोंडा, सफौ एम. डी. नदाफ, गजानन कणगिरी, शरिफ शेख, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक-भारत गायकवाड, पो.कॉ. इकरार जमादार, उमेश सावंत, युवराज गायकवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, विठ्ठल जाधव यांनी पार पाडली.

To Top