अनुभवी, कार्यतत्पर प्रतिनिधी म्हणून प्रभाग 23 मध्ये प्रकाश राठोड यांच्या संभाव्य उमेदवारीला मिळतोय अधिकच प्रतिसाद"

shivrajya patra

सोलापूर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वर्तुळात खळबळ वाढली आहे. सोलापूर शहरातही विविध चर्चांना वेग आला असून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव प्रकाश राठोड यांचंही नांव इच्छुकांच्या यादीत सर्व परिचित म्हणून पाहिलं जातंय.
भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव प्रकाश राठोड, गत वर्षापासून सातत्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय असलेला चेहरा म्हणून गणला जातोय. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जनमानसात विशेष दखलपात्र ठरत आहेत. महानगरपालिकेत तब्बल 21 वर्षे सेवा बजावल्यामुळे त्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव लाभला आहे. विविध विभागांचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. या अनुभवाच्या जोरावर महापालिका स्तरावरील अनेक प्रलंबित कामे जलद गतीने मार्गी लावण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे.

यासोबतच भारतीय जनता पक्षाची घरोघरी पोहोच वाढविण्यासाठी मोठे योगदान देत प्रभागातील नागरिकांचा पक्षाशी संपर्क अन् संवाद अधिक मजबूत करण्याचे कार्य राठोड यांनी केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय स्तरावर त्यांनी घेतलेले उपक्रम आणि लोकसहभागातून केलेल्या कामांमुळे त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.

प्रभाग क्रमांक 23 मध्ये सुशिक्षित, अनुभवी आणि युवा नेतृत्व म्हणून प्रकाश राठोड यांची ओळख अधिक ठळक होत चालली आहे. शासन व प्रशासन दोन्हीचा अनुभव, नि:स्वार्थ सेवाभाव आणि लोकांमध्ये मिसळून काम करण्याची शैली यामुळे त्यांच्याकडं या प्रभागाचा जनप्रतिनिधी अशी लोकभावना असल्याचे दिसून येत आहे.


To Top