निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी महत्वाचे ... ! जिल्ह्यातील 17 धर्मादाय रूग्णालये कार्यरत

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीची बैठक गुरूवारी, 06 नोव्हेंबर 2025 रोजी अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सोलापूर  कुमार आशीर्वाद, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली असून या बैठकीत धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णासाठी असलेली योजना व त्याची अंमलबजावणीबाबत उपाययोजना करणेबाबत सविस्तर बैठक पार पडली. 

या बैठकीत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेली योजना व सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाची यादी नागरिकांना माहिती व्हावी व त्याचा व्यापक प्रसार व्हावा याकरीता जिल्ह्यातील वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

*उच्च न्यायलय, मुंबई यांचे रिट याचिका (पी.आय.एल.) क्र. 3132/2004 मधील दि.17 ऑगस्ट 2006 व 15 एप्रिल  2009  आदेशाप्रमाणे धर्मादाय रुग्णालयांनी अंमलात आणावयाची योजना

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये ज्यांची सार्वजनिक न्यास म्हणून नोंद झालेली आहे व सदर धर्मादाय न्यास जे धर्मादाय रुग्णालय ज्यामध्ये सुश्रुषालय/प्रसुतीगृह दवाखाना किंवा वैद्यकीय मदत देणारे केंद्र चालवित आहे व ज्यांचा वार्षिक खर्च हा वैद्यकीय कारणास्तव पाच लाख रुपयापेक्षा जास्त आहे, असे न्यास कलम 41 अअ च्या अंतर्गत शासकिय अनुदानित सार्वजनिक न्यास म्हणून समजले जातील.

वरील कलम 1 अंतर्गत येणाऱ्या न्यासाबाबत त्यांनी वैद्यकिय केंद्रात कार्यान्चित असलेल्या खाटांच्या संख्येपैकी एकूण 10 टक्के खाटा निर्धन व 10  टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी (एकूण खाटांपैकी 20 टक्के खाटा) आरक्षित ठेवल्या जाऊन अशा रुग्णाकरीताच राखून ठेवल्या पाहीजेत.

धर्मादाय रुग्णालयांनी खाली नमुद सेवा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत दिल्या जातात 1) खाटा 2) निवासी वैद्यकिय अधिकार सेवा 3) सुश्रुषा 4) अन्न (जर पुरवित असेल तर) 5) कापड 6) पाणी 7) विज 8) नित्य निदान विषयक सेवा इतर सर्वसामान्य सेवा, ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न रु.१,८०,०००/- (एक लाख ऐंशी हजार रुपये) च्या आत आहे असे रुग्णांना निर्धन रुग्ण म्हणून संबोधले जाते. 

अशा रुग्णांना वैद्यकिय तपासणी, उपचार व औषधे मोफत दिले जातात. ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न रु.3,60,000/- (तीन लाख साठ हजार रुपये) च्या आत आहे असे रुग्णांना दुर्बल घटकातील रुग्ण म्हणून संबोधले जाते, अशा रुग्णांना वैद्यकिय तपासणी व उपचार 50 टक्के सवलतीच्या दरात दिली जाते. औषधे, उपयोगात आणलेल्या वस्तू व शरीराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार हा रुग्णालयांनी केलेल्या खरेदीच्या किंमतीत लावण्यात येतो. मात्र सदर रुग्णास या वस्तूची 50 टक्के किंमत द्यावी लागते.

रुग्णांनी उत्पन्नांच्या पुराव्यासाठी तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळी/केशरी शिधापत्रिका (रेशनकार्ड) यापैकी एक दस्तऐवज संबंधीत धर्मादाय रुग्णालयात सादर करावा. धर्मादाय रुग्णालयांतील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार करण्यास कसुर/टाळाटाळ केल्यास मा. धर्मादाय उप आयुक्त, सोलापूर यांच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नाथ प्राईड विल्डिंग, पहिला मजला, उत्तर बझार, सोलापूर-413003 या कार्यालयात लेखी तक्रार किंवा दुरध्वनी क्र.0217-2318001 किंवा हेल्पलाईन क्र. 1800222270 येथे नोंदवावी, अशी माहिती धर्मादाय उप आयुक्त, (प्रतिनियुक्त न्यायाधीश)  ईश्वर कां. सुर्यवंशी यांनी दिली आहे.

सोबत –रुग्णालयांची यादी.

रुग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे

1. आश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर,

पत्ता - गट नं. 261 आणि 262, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.

नाव – डॉ. उमाकांत ढगे, संपर्क क्र. 9423590415/ डॉ. करजखेडे संपर्क क्र. 7719094216,

2. श्री जगदाळे मामा हॉस्पिटल,

पत्ता – कर्मवीर नगर, बार्शी, जि. सोलापूर

नाव – श्री सचिन गारमपल्ली, संपर्क क्र. 9676755620

3. नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल,

पत्ता - बार्शी, आगळगाव रोड, जि. सोलापूर

नाव – श्री. राहुल शिराळ , संपर्क क्र. 9822741529

4.  शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय,

पत्ता - 118/119, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदीक हॉस्पिटल, जुनी फौजदार चावडी जवळ, सोलापूर

नाव – श्री. डी. आर. समर्थ, संपर्क क्र. 8766825261

5. यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,

पत्ता - 6158, सिध्देश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापूर

नाव – श्री. सुकांत बेळे, संपर्क क्र. 9595258488

6. जनकल्याण हॉस्पिटल,

पत्ता - 62/1/2, जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर

नाव – डॉ. सुधीर शिनगारे, संपर्क क्र. 9922614724

7. श्री. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,

पत्ता - 276/१ पी, दैनिक संचार ऑफीस जवळ, सोलापूर

नाव – श्री. हनमंत पाटील, संपर्क क्र. 8805450565

8.  युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,

पत्ता -  283/1 बी, होटगी रोड, मुलतानी बेकरी मागे, सोलापूर

नाव – श्री. राहुल यमाजी, संपर्क क्र. 9403412249

9. लोकमंगल जीवक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर,

पत्ता - पी 12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट, एम.आय.डी.सी. प्लॉट नं. 12, निलम नगर, सोलापूर

नाव – श्री. अंबादास सिलगारी, संपर्क क्र. 8975722093

10. धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्ट,

पत्ता - 4, रेल्वे लाईन, सोलापूर महानगरपालिकेच्या मागे, सोलापूर

नाव – श्री. चोपडे एस. एस., संपर्क क्र. 9850989053

11. श्री विठ्ठल हॉस्पिटल,

पत्ता - पुणे रोड, के.बी.पी. कॉलेजच्या समोर, पंढरपूर, जि. सोलापूर

नाव - नुतन मोरे संपर्क क्र. 99221951..

12.  लायन्स मधुराबाई फत्तेचंद ब्रिजमोहन दमाणी हॉस्पिटल, लॉयन बी.पी. नेत्रालय, मथुराबाई फत्तेचंद हॉस्पिटल,

पत्ता - 125, दमाणी नगर, पावन गणपती जवळ, सोलापूर

नाव - डॉ. शिवाजी पाटील, संपर्क क्र. 9665696315

13. अल-फैज जनरल हॉस्पिटल,

पत्ता -सिध्देश्वर पेठ, बेगम पेठ पोलिस चौकी जवळ, सोलापूर

नाव - बिलाल मोमीन, संपर्क क्र. 9192992421

14.  गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल,

पत्ता -13, बुधवार पेठ, 14 बाळीवेस रोड, विद्यानंद कॉ. ऑप बँके जवळ, सोलापूर

नाव - रमेश कांबळे, संपर्क क्र. 9850328324

15. इंडियन कॅन्सर सोसायटी,

पत्ता - 8389/2 बी, रेल्वे लाईन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर

नाव - पियुषा देशपांडे, संपर्क क्र. 9975502544

16. श्रीमती मल्लावाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल  हॉस्पिटल,

पत्ता - 2, 3, गणेश शॉपींग सेंटर, सोमवार पेठ, सोलापूर

नाव - श्रीनिवास मंताठी, संपर्क क्र. 9423536188

17. पंडीत दिनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय व हॉस्पिटल,

पत्ता - 19/1, पंडीत दिनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव, देगाव रोड, सोलापूर 

नाव – श्री. संतोष देशमाने, संपर्क क्र. 7972688224

To Top