उत्तर सोलापूर : तालुक्यातील कुमठे प्रशालेच्या प्रांगणामधे कुमठे प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रविकास प्राथमिक विद्यामंदीर, लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल या सर्व विभागातील 02 हजार विद्यार्थ्यांनी सामुहिक 'वंदे मातरम्' गायिले.
बंकिमचंद्र चटर्जी लिखित 'आनंदमठ' मधील 'वंदे मातरम्' ला शुक्रवारी, 07 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पुर्ण झाली. या दिनाचं महत्व प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनी सांगितले. 
तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस म्हणजेच विद्यार्थी दिन म्हणूनही, 07 नोव्हेंबर दिवसाचे महत्व आहे, असेही सांगितले. 
पर्यवेक्षक वसंत गुंगे यांनी, 'वंदे मातरम्' स्वातंत्र्यपूर्व काळातील स्फुर्तीदायक गीत बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहीले. ते म्हणजेच स्वातंत्र्य काळातील प्रत्येकाच्या ओठावरील हे गीत होते, असे सांगितले.
या सामुहिक गीत गायन समयी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंगला नाईकनवरे-मोरे, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या शुभांगी पवार, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक संजय जाधव व सर्व विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
