धाकट्या राजवाड्यातील 02 टोळ्या; 07 जण तडीपार

shivrajya patra

सोलापूर : येथील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांमधील 07 जणांवर पोलीस आयुक्तालयानं तडीपारीची कारवाई केलीय. त्यात टोळीप्रमुख मनोज राम गायकवाड याच्या टोळीतील मनोजसह चौघांचा तर राम शशिकांत तळभंडारे टोळीतील रामसह तिघांचा समावेश आहे. त्या 07 जणांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 02 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय.

मनोज राम गायकवाड (वय-45 वर्षे), रितेश मनोज गायकवाड (वय-22 वर्षे), योगेश चंद्रकांत कोळेकर (वय-25 वर्षे), आनंद राम गायकवाड (वय-45 वर्षे, सर्व रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर) या चौकडीविरुध्द सन 2015 पासून आजमितीअखेर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्याकडं सादर करण्यात आला होता.

या चौकडीला पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी तडीपार आदेश जा. क्र. 2659/25/03/10/2025 अन्वये तर 2660/25 अन्वये तळभंडारे टोळीतील तिघांना 02 वर्षांकरिता तडीपार केलंय.

टोळीप्रमुख राम शशिकांत तळभंडारे (वय-29 वर्षे), विजय कामेश वाघमारे (वय-30 वर्षे) आणि शिवाजी मारुती तळभंडारे (वय- 42 वर्षे, सर्व रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर.) अशी त्यांची नांवं आहेत . त्यांच्याविरुध्द सन 2018 सालापासून आज अखेर कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय.

To Top