बंजारा समाजाच्या ST आरक्षण मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन : प्रा. भोजराज पवार

shivrajya patra

सोलापूर : बंजारा समाजाला ST आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी बंजारा समाजाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बंजारा समाजाचे नेते प्रा. भोजराज पवार यांनी दिलीय.

महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी बंजारा समाजाची काशी अशी ख्याती असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी इथं या सप्ताहात, 16 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार यांना या बैठकीस आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानुसार प्रा. पवार यांनी सोलापूर जिल्ह्याची सद्यस्थिती व आंदोलनासंबंधी बंजारा समाज बांधवांची मानसिकता राज्यातून आलेल्या प्रमुखांसमोर मांडली. 

याप्रसंगी धर्मगुरू बाबुसिंग महाराज, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, आमदार राजेश राठोड, हरिभाऊ राठोड, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बापूराव राठोड ,राजूसिंग राठोड, हिरालाल राठोड, अॅड.रमेश राठोड, उद्योजक संतोष पवार व विविध जिल्ह्यातील नेते व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

नोव्हेंबर महिण्यात 02 वा 03 तारखेला प्रत्येक जिल्हास्थळावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाला. येत्या काळात नागपूर हिवाळी अधिवेशनात किंवा मंत्रालय मुंबई येथे बंजारा बांधवांचा विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रा. भोजराज पवार यांनी सांगितलंय.

To Top