सोलापूर : सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र विकास महामंडळ पुणे, कृषि विभाग व प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आंबा उत्तम कृषि पध्दती (GAP) प्रशिक्षण कार्यक्रम" शुक्रवारी, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वा. येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित केलं आहे.
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉ. भगवान कापसे (निर्याक्षम आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान) व हेमंत जगताप (आंबा प्रक्रिया उद्योग), 
डॉ. निलेश मोरे केबी एक्सपोर्ट फलटण (आंबा निर्यात कृषि पध्दती), श्रीमती दिपमाला खनके, मॅग्नेट प्रकल्प ( लिंग समानता व सामाजिक समावेशक) तसेच पंढरपूर चळे येथील प्रगतशील शेतकरी वासुदेव गायकवाड (केसर आंबा प्रक्रिया व विक्री व्यवस्था) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील बीटीएम व ओटीएम आत्मा कर्मचाऱ्यांकडे नाव नोंदणी करावे. महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल, असं आवाहन आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत यांच्यावतीने आवाहन करण्यात आलं आहे.
