सोलापूर : बांधकाम कामगार म्हणून मनीषा गुर्रम यांनी बनावट कागदपत्रे सादर करून, बांधकाम कामगार योजनेतील आर्थिक लाभ मिळविले आहेत, त्यांनी ठेकेदार म्हणून काम करण्याचा बेकायदेशीर गोरखधंदा सुरु केला आहे. गुर्रम यांनी शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची तपासणी करून बोगस ठेकेदार गुर्रम यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी व सेक्रेटरी सोहेल शेख यांनी लेखी तक्रारी निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्तांकडं केलीय.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात, सध्या शासनाच्या माध्यमातून व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून, लाभ मिळविल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यात भर म्हणून खाजगी एजंट असलेल्या मनीषा गुर्रम या बांधकाम कामगार योजनेतून योजना क्र१. H01 नैसर्गिक प्रसूतीचा 15, 000 रुपये लाभ घेतलाय.
०२. गृह उपयोगी भांडी संच आणि ०३. सुरक्षा किट संच असे तिन्ही प्रकारचे लाभ घेतले आहेत. गुर्रम यांनी त्या ठेकेदार नसताना, ठेकेदार म्हणून शेकडो लोकांना सही शिक्के दिले आहेत, हे बेकायदेशीर व शासकीय पैशाचा अपहार केला आहे, हा कायद्याने गंभीर अपराध आहे.
सहाय्यक कामगार आयुक्तांनी या निवेदनाची गंभीरतेने दखल घेऊन बोगस ठेकेदार मनीषा गुर्रम यांच्या बेकायदेशीर कामाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्याचबरोबर त्यांनी ज्यांना वाम मार्गाने लाभ मिळवून दिला, याचीही चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात सोहेल शेख, रेखा आडकी, पप्पू शेख, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी होते.
