सोशल महाविद्यालयातील उर्दू विभागाचे प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांना "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्कार

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ महाविद्यालय एस. एस. ए. आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालयातील उर्दू विभागाचे प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांना 2019 सालाकरिता ''राज्यस्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, 07 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उर्दू भाषेत अध्यापन सेवा देणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. 

प्रा. डॉ. गौस अहमद शेख हे गेल्या १८ वर्षांपासून सोशल महाविद्यालयातील उर्दू विभागात उर्दू भाषा आणि साहित्य शिकवतात तसेच उर्दूच्या विकास आणि संवर्धनात निःस्वार्थ सेवा देत आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि अध्यापन सेवांच्या कौतुकार्थ त्यांना "पाच आदर्श शिक्षक" पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नल्स आणि मासिकांमध्ये संशोधन आणि लेख लिहिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ते दरवर्षी विद्यापीठ स्तरावर पाठ्य-पुस्तके देखील संकलित करतात. सोलापूर विद्यापीठात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली आतापर्यंत चार विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. गेल्या दशकापासून ते सोलापूर विद्यापीठातील अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली सेवा देत आहेत.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अखलाक अहमद वडवान, बज्मे गालिब सोलापूरचे अध्यक्ष बशीर परवाज आणि सदस्यांनी तसेच उर्दूशी संबंधित अनेक संघटनांनी, आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांचं अभिनंदन करीत, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी, डॉ. शफी चोबदार, डॉ. आसिफ इक्बाल व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्यांचं अभिनंदन केले.

To Top