सोलापूर : NSRO Team, INS शिवाजी, लोणवळा यांचे मार्फत दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे नेव्हीमधून सेवानिवृत झालेले माजी सैनिक, वीर पत्नी/वीर माता-पीता यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
जिल्हामधील नेव्हीमधून सेवानिवृत झालेल्या माजी सैनिक व वीर पत्नीनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.
