सोलापूर : जिल्हा लोकशाही दिन सोमवारी, 03 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी जनतेच्या तक्रारी गाऱ्हाणी ऐकण्याकरीता त्या-त्या विभागातील विभाग प्रमुखांनी उपस्थित राहणे बाबतचे निर्देश शासन परिपत्रकान्वये प्राप्त आहेत.
या दिवशी आपलेकडील मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाचे निवेदनावर केलेली कारवाईचा अहवालासह हजर रहावे. तसेच आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही इ. माहितीसह सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे उपस्थित रहावं, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविलं आहे.
लोकशाही दिनी गैरहजर राहणार असल्यास त्याबाबतpiं .r १ T जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याचं प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय.
