जिल्हा ग्रामीणमध्ये जमावबंदी- शस्त्रबंदी

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोयीचे जावे, यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) 25 ऑक्टोबर रोजीचे 20.00 वाजलेपासून ते 09 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 20.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(3) आणि कलम 37(1) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्यात येत असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
कलम 37 (3) च्या आदेशानुसार पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालत आली आहे. हा हुकुम अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणांना लागू होणार नाही. तसेच ज्या प्रकरणी जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे. अशा यात्रा स्थळे व तत्सम प्रकरणांपुरते लागू होणार नाही, असे पत्रकात नमूद आहे.

कलम 37 (1) च्या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:

- मिरवणुका, सभा, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव 

- शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू 

- ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ 

- दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन 

- सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा 

- जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य 

या हुकुमाचे खंडन अ ते फ ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू पडणार नाही, असेही पत्रकात नमूद आहे.

To Top