"साया" काव्य संग्रहाचे प्रकाशनानंतर पार पाडले उर्दू-मराठी कवी संमेलन
सोलापूर : शकील शेख यांनी आपल्या 'साया " काव्यसंग्रहातून समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नावर आपल्या कविता लिहून समाज परिवर्तनाला वाट मोकळी करून दिली आहे, कविता हे मनाचा वेध घेणारा एक उत्तम प्रकार व समाज परिवर्तनचे उत्तम साधन आहे, असं मत साहित्यिक अब्दुल रहमान जानी यांनी व्यक्त केले.
भारतीय उर्दू विकास फौंडेशन व इंडियन युथ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शमा उर्दू शाळेत शीन शकील शेख लिखित "साया" काव्यसंग्रहाचे प्रकाशन उर्दूचे ज्येष्ठ कवी आरजू राजस्थानी यांच्या हस्ते व साहित्यिक अब्दुल रहमान जानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी विचारपीठावर नासीर अजीम (कलबुर्गी), अय्यूब नल्लामंदू, सुलतान अख्तर, शीन शकील (छत्रपती संभाजीनगर) यांच्या प्रमुख उपस्थित प्रकशन करण्यात आले. 
उर्दू विकास फौंडेशनचे सुलतान अख्तर यांनी प्रास्तविक करत पाहुण्यांचे परिचय करून दिला तर इंडियन युथ असोसिएशनचे अबुबकर नल्लामंदू, मजहर अल्लोळी यांनी प्रमुख पाहुण्याचे शाल व हार घालून स्वागत केले.
यावेळी शिन शकील, रहमान जानी, नासीर अजीम, अय्यूब नल्लामंदूनी आपले मनोगत व्यक्त करून "साया" च्या माध्यमातून उर्दू साहित्यात एक नवीन पुस्तकाची भर झाल्याने शुभेच्छा दिल्या.
कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर बहुभाषिक उर्दू-मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कवी मुबारक शेख, बदिऊज्ज़मां बिराजदार, जावीद शेख, आरजू राजस्थानी, मयुरेश कुलकर्णी, नासीर अजीम, अब्दुल रहमान जानी, अशफाक जैद, इरफान कारीगर, अय्यूब अहमद, आसीफ शेख यांनी आपल्या उर्दू, मराठी कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली.
यावेळी इक्बाल बागबान, सय्यद इक्बाल, जाफर बांगी, शाकीर चाँदा, अ. रशीद शेख, आसीफ शेख उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. डॉ. रशीद शेख यांनी केले तर अबरार नल्लामंदू यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
