सह्याद्री चषक - 2025 चा जल्लोषात प्रारंभ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

shivrajya patra

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील उळेगांव येथे सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या पुढाकाराने आयोजित सह्याद्री चषक-2025 या प्रतिष्ठित टेनिस बॉल क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषमय वातावरणात पार पडले. 

या वर्षीचा सह्याद्री चषक स्पर्धेचा अकरावा वर्धापन वर्ष असून, उद्घाटन सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात झाला.

या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे अधिकृत टी-शर्ट अनावरण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य शहाजी पवार यांच्या हस्ते दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक झाला.

सह्याद्री फाउंडेशन गेल्या अकरा वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन करत असून, ग्रामीण भागातील युवकांमध्ये संघभावना, शारीरिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि खेळांविषयीची आवड वाढविण्याचे उद्दिष्ट या स्पर्धेमागे आहे. 

अशा क्रीडा उपक्रमांमुळे गावातील तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आणि सहकार्याची भावना दृढ होते. ग्रामीण भागातील क्रीडाक्षेत्राला चालना देऊन सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श या स्पर्धेमुळे निर्माण होत आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नेताजी खंडागळे यांच्या निवासस्थानी बोरामणी, मुस्ती, कासेगांव पंचक्रोशीतील मान्यवरांसोबत स्नेहफराळ केला.

याप्रसंगी सिद्धेश्वर मार्केट कमिटी उपसभापती सुनील कळके, भाजपा मंडल अध्यक्ष महादेव पाटील, राजेश जगताप, डॉ. कुंभार, सिद्धाराम हेले, नाना भोसले, किसन म्हस्के, प्रथमेश भोसले, वैभव हलसगे, राज साळुंखे, आकाश माशाळे, मधुकर चिवरे, इरेश अंबारे, सिताराम राठोड, बालाजी कवडे, मारुती बिराजदार, धनाजी काळे, सागर पवार, वसीम कारभारी, विश्रांत गायकवाड, सुधाकर पाटोळे, सज्जन पाटील, स्वामीराव पाटील, हनुमंत सरडे, बंडू चेंडके, संजय पाटील, नामदेव हाक्के, गणी शेख, रहीम शेख, सरकार पाटील, राजू गुंड, शिवा गुंड, आबा भोसले, सिताराम जाधव, दत्ता खंडागळे, कासेगांवचे सरपंच यशपाल वाडकर, प्रवीण चौगुले, ज्ञानेश्वर कदम, शिवराज जाधव, प्रशांत जाधव, गणेश कोले आणि प्रवीण कासार आदी मान्यवर उपस्थित होते.

To Top