सोलापूर : जेलरोड पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावानुसार पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) कार्यालयानं मैनोद्दीन म. रफिक हत्तुरे (वय-32 वर्षे, रा. 403, हत्तुरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ, सोलापूर) याला 02 वर्षाकरीता तडीपार केलंय.
मैनोद्दीन हत्तुरे हा माजी नगरसेवक स्व. म. रफीक हत्तुरे यांचा मुलगा असून त्याच्याविरुध्द सन 2016, 2021, 20223 आणि 2025 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, मुलींना जबरदस्तीने पळवून नेणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे पोलीस दफ्तरी दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मैनोद्दीन हत्तुरे यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय.
