सोलापूर : मोबाईल चोरी यासारखे गुन्हे दाखल असलेल्या 27 वर्षीय राजकुमार आनंदय्या स्वामी याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. त्याची ही तडीपारी 02 वर्षांकरिता असल्याचं आलंय.
सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 03 मधील रहिवासी राजकुमार स्वामी याच्याविरुध्द सन २०२५ या कालावधीमध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलंय. त्यावर सदर बझार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी, 10 जून 2025 रोजी राजकुमार स्वामी यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार केलं आहे. त्यास तडीपार केल्यानंतर मुंबई येथे सोडण्यात आलं असल्याचं पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कानडे (वाचक शाखा) यांनी,08 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
