सोलापूर : जुळे सोलापुरात दिवसाढवळ्या घरफोडी केलेल्या 02 सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकांनं जेरबंद केलंय. सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय-34 वर्षे) आणि राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय-35 वर्षे) चोरट्यांची नांवं आहेत. उभयतांकडून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागीने- वस्तू तसेच गुन्हा करण्याकामी आरोपींनी वापरलेली 01 मोटार सायकल असा 3,15,200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटणीस नगर अंबिका रेसिडेन्सीमधील रहिवासी सौ. रेखा कैलास चौधरी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार 24 सप्टेंबर रोजी घडला.
त्याच दिवशी दुपारी जुळे सोलापुरातील विशाल नगरात सौ. पुनम सतिश वांगी (वय-43 वर्षे) यांच्याही घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 22,000 रुपयांची रोख रक्कम व 06 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसुत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असा अंदाजे 1,17,000 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. 
याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळी मिळालेल्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे, सपोनि खेडकर व त्यांच्या तपास पथकाने हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची खात्री करुन आरोपीची ओळख पटविली.
त्यात ओळख पटलेल्या आरोपींपैकी 30 सप्टेंबर रोजी रोजी सपोनि खेडकर, यांनी सुर्यकांत उर्फ चिन्या माने (रा. मोरया हौसींग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे) यास पिंपरी चिंचवड येथून तर 04 ऑक्टोबर रोजी दुसरा आरोपी राम उर्फ रामजाने क्षीरसागर (रा. मु.पो.वाघोली ता. कळंब जि. धाराशिव) यास अटक केली. उभयतांकडून 3,15,200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
