सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत ऑगस्ट 2025 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेत सदाबजहाँ इसाक बागवान अतनूरकर यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
सदबजहाँ बागवान अतनूरकर यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजी हे दयानंद कॉलेजमधून तर बी.एड.चे शिक्षण सोशल कॉलेजमधून पूर्ण केले आहे. आपल्या अभ्यासात चिकाटी आणि समर्पण यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
त्यांच्या या उत्तुंग यशामध्ये तिच्या पालकांचा प्राध्यापकांचा व मित्र परिवारांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
