सोलापूर : सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत एकूण 03 सुवर्णपदके पटकावली.
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील विद्यार्थिनी कु. मिस्बाह मुजावर हिने इंग्रजी विषयात तब्बल 02 सुवर्णपदके मिळवली आहेत. तिला संपूर्ण बी. ए. इंग्रजीमध्ये व तृतीय वर्ष बी.ए. इंग्रजीमध्ये सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. तसेच उर्दू विभागातील विद्यार्थिनी कु. अक्सा कुमठे हिला उर्दू विषयात सुवर्णपदक प्राप्त झाले.
दरम्यान, उर्दू पीएच.डी. रिसर्च सेंटरमधून याच शैक्षणिक वर्षात तिघांनी आपले पीएच.डी. शिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये डॉ. आसिफ इकबाल शेख, डॉ. अफ्रीन महेबूब दलाल आणि डॉ. तसनीमबानो वड्डो यांचा समावेश आहे.
या तिन्ही संशोधकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर उर्दू विभागाचे उर्दू अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गौसअहमद शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. मिस्बाह मुजावर यांना डॉ. अस्मा खान तर कु. अक्सा कुमठे यांना डॉ. शफी चोपदार व डॉ. गौसअहमद शेख यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले.
या सर्व यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
