आव्हानांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची गरज : हाफिज अब्दुल रजाक-चौधरी

shivrajya patra

सोलापूर शहर बागबान जमियत सिटी ट्रस्टतर्फे शिक्षकांचा सत्कार 

सोलापूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना मूल्य शिक्षणावर भर द्यावा, विद्यार्थ्यांमध्ये सेवेची भावना रुजवावी, भविष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या पेलतील, असं सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे, असे मत शिक्षक दिनानिमित्त हाफिज अब्दुल रजाक-चौधरी यांनी व्यक्त केले. 

सोलापूर शहर बागबान जमियत सिटी ट्रस्टच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३० शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहर बागबान जमियतचे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल होते. 

यावेळी हाफिज अब्दुल रजाक चौधरी यांना जमियतुल उलेमा हिंदच्या सेक्रेटरीपदावर नियुक्त झाल्याबद्धल सत्कार करण्यात आला. तसेच हाफिज अ. सलाम बागवान यांचा जमियतुल उलेमा हिंदच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून तर अश्फाक बागबान यांचा सोलापूर मध्य विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमात सोलापूर शहर बागबान जमियत सिटी ट्रस्ट संचलित बागबान युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा व सल्लागार समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाला मौलाबक्ष तुळजापूरे, अल्ताफ लिंबूवाले, अखलाक मर्चंट, इम्तियाज दलाल, रईस बागबान, अय्युब कल्याणी, मुश्ताक एम. राऊंड, सादिक सत्यम, मुश्ताक खलिफा, इफ्तेकार तुळजापूरे, नाजीम कामतीकर, हाफिज सलाम, एजाज बागबान उपस्थित होते. 

शिक्षण कमिटी चेअरमन डॉ. हारून रशीद यांनी प्रास्तविक केले. अल्लाबक्ष बागबान यांनी सूत्रसंचालन केले तर फय्याज बागबान यांनी आभार मानले.

To Top