राजा बागबान, सुलतान शेख, डॉ. आयेशा पठाण, मौला मुद्देल, एहतेशाम नदाफ, नईम शेख पुरस्काराचे मानकरी
सोलापूर : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई च्या वतीने सन 2021, 22 आणि 23 अशा तीन वर्षाच्या उर्दू साहित्य व शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सर्व साहित्यिक, शिक्षक व पत्रकारांना "उर्दू साहित्य सेवा पुरस्कार" जाहिर करण्यात आले असून, यात सोलापूरकरांनी बाजी मारली आहे.
तरुण उर्दू साहित्यिक, कथाकार, 12 पुस्तकांचे प्रकाशक सुलतान अख्तर, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्य कलाकार व नाट्य लेखक राजा बागबान, सोलापूर विद्यापीठच्या डॉ. सौ. आयेशा पठाण, पितापूरच्या जि. प. उर्दू शिक्षक मौला मुद्देल, उर्दू लेखक डॉ. एहतेशाम मोहियोद्दीन नदाफ आणि मुंबई येथे आपली 32 वर्षाची शिक्षकेची सेवा बजावत असलेले नईम इकबाल शेख यांचा पुरस्कार मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.
हे पुरस्कार मुंबई येथे उर्दू साहित्य अकादमीच्या गोल्डन ज्युबली कार्यक्रमात 06 ते 08 ऑक्टोबरला सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमीच्यावतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊर्दू मराठी साहित्य परिषदचे प्राचार्य इ. जा. तांबोळी, ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब अहमद नल्लामंदू, सदाए महाराष्ट्रचे डॉ. म. शफी चोबदार, प्राचार्य रिजवान शेख, विरसा फौंडेशनचे सय्यद इक्बाल, अशफाक सातखेड, रोटरी क्लबचे इक्बाल बागबान, जाफर बांगी, मजहर अल्लोळी यांनी सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यीकांचं अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
