सोलापूर : येथील सोशल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, सोलापूर येथील विज्ञान शिक्षक प्रा. शेख इरफान सर यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ या नामांकित पुरस्काराने नुकताच प्रदान करण्यात आला.
पुणे येथील प्रादेशिक शिक्षक संघटनेच्या पुरस्कारांकडं राज्यस्तरीय गौरवाचं प्रतिक म्हणून पाहिलं जाते. प्रा. शेख इरफान यांनी अध्यापन प्रवासाची सुरुवात सोलापूर सोशल असोसिएशन्स ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इथं 1999 साली केली. त्यांचा 26 वर्षांहून अधिक अद्ययावत अध्यापन सेवेचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकही "कॅज्युअल लीव्ह" न घेता सलग सेवा हेही त्यांच्या एकूण वैशिष्ट्यांत एक आगळं-वेगळं वैशिष्ट्य म्हणून पाहिलं जातंय.
प्रा. शेख इरफान शासनाकडून 2008 पासून "रिसोर्स पर्सन" म्हणून कार्य करीत आहेत. समाज मनात जागतिक स्तरावरील महामारी म्हणून गणल्या गेलेल्या कोविड-19 जनजागृती कार्यक्रमात "कोरोना मित्र" म्हणूनही त्यांचं उल्लेखनिय योगदान राहिलं आहे.
सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत यूट्यूब चॅनेल सुरू केलं -Simplified Physics Irfan Shaikh. त्यांचा ऑल इंडिया उर्दू लिटरेसी कार्यक्रमात सहभाग राहिला असून "जन सेवा आणि अखिल भारतीय शिक्षक संघ" यांच्याकडूनही प्रा. शेख यांचा गौरव झाला आहे.
प्रा. शेख इरफान यांच्या शैक्षणिक प्रदिर्घ सेवेबरोबरच आजवर समाज व विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन प्रादेशिक शिक्षक संघटनेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविलं आहे. त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
