सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा सुसूत्रता मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी ब्रम्हदेव गायकवाड

shivrajya patra

नवरात्रीतही डॉल्बी मुक्तीचा सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा सुसूत्रता मंडळाचा निर्णय 

सोलापूर : गौरी-गणपती उत्सवानंतर आता चाहूल लागली आहे ती नवरात्र उत्सवाची... ! याच पार्श्वभूमीवर शनिवारी शिवानुभव मंगल कार्यालयात सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा सुसूत्रता मंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी ब्रम्हदेव गायकवाड, उपाध्यक्ष शिवानंद सावळगी, निलेश शिंदे याच्यासह नूतन कार्यकारिणीची एकमतानं निवड करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी आदिशक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बैठकीस सुरुवात करण्यात आली. यानंतर माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष न्हावकर यांचे वडील आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नारायणराव न्हावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

प्रारंभी गतवर्षीचे उत्सव अध्यक्ष अॅड. प्रशांत कांबळे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  त्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. रूपा भवानी मंदिराचे मुख्य मानकरी मल्लिनाथ मसरे, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे, दत्तात्रय मेनकुदळे, अमोल शिंदे, गौरव पिसे यांच्या नेतृत्वात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सुरज पाटील, सचिव किसन गर्जे, मिरवणूक प्रमुख अतिश दशेट्टी, बाबा शेख, अनिकेत जवंजाळ, खजिनदार राजा कणके यांचा समावेश आहे. या बैठकीत गणेश उत्सवानंतर नवरात्रीतही डॉल्बी मुक्तीचा निर्धार करण्यात आला.आदिशक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची महाआरती करून बैठकीचा समारोप करण्यात आला.

या प्रसंगी शिवलिंग गायकवाड, प्रशांत गायकवाड, गणेश गायकवाड, मारुती गायकवाड, गणेश चिंचोळी, संजय पवार, काशिनाथ गायकवाड यांच्यासह भक्त गणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

... चौकट 

घन कचरा व्यवस्थापन विभाग उत्सवापुरता इतरत्र हलविणे गरजेचे

नवरात्री उत्सवात कोणतीही बाधा निर्माण होणार नाही, याची पोलीस प्रशासन व सोलापूर महानगर पालिकेने काळजी घेणे गरजेचे आहे. रुपाभवानी परिसर मुख्य चौकातील सोलापूर महानगरपालिकेचा घन कचरा व्यवस्थापनाचा विभाग उत्सवापुरता तात्पुरता इतर ठिकाणी हलविणे आवश्यक आहे, असं दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, मानकरी मल्लिनाथ मसरे, उत्सव अध्यक्ष ब्रम्हदेव गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

...चौकट

महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा प्रश्न प्राधान्याने लावावा मार्गी 

रूपा भवानी मातेच्या दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने भक्त भाविक मंदिराकडे प्रस्थान करत असतात. अशावेळी भक्त भाविकांना मोकाट जनावरांमुळे अडचणी येत असतात. या जनावरांमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली दृश्य निदर्शनास पडते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देऊन तो प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी पुढं आली. 

To Top