श्रीमंत बनसोडे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

shivrajya patra

मोहोळ : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सहशिक्षक श्रीमंत बनसोडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने करण्यात आले. शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते हा पुरस्कार बनसोडे यांना प्रदान करण्यात आला. 

याप्रसंगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने, संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी माने, उपाध्यक्ष महेश सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशालेतील सहशिक्षक  श्रीमंत बनसोडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याप्रित्यर्थ मुख्याध्यापक काशीद आणि सर्व शिक्षकांनी  बनसोडे यांचं अभिनंदन केले.

To Top