विठ्ठलराव पवार यांचं निधन; पत्रकार संतोष पवार यांना पितृशोक

shivrajya patra

सोलापूर : व्यासंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव मारोतीराव पवार यांचं २६ सप्टेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळात निधन झाले. ते मृत्यूसमयी ८६ वर्षीय होते. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी परभणी जिल्हा, जिंतूर तालुक्यातील आसेगाव इथं शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिंतूर तालुक्यातील आसेगांव येथील व्यासंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव पवार यांनी लांडाळा आणि सिद्धेश्वर कॅम्प येथे सेवा केली. त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या काळात त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. ३६ वर्षे विना चप्पल आणि एकही मिनिट शाळेत विलंब न करता आपले योगदान दिले. जुन्या काळातील शिस्तप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार आणि प्रकाशक संतोष पवार यांचे वडील होत. 


To Top