भगवान चौगुले 'नेशन बिल्डर अवार्ड' चे मानकरी

shivrajya patra

कासेगाव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवचे भगवान चौगुले यांचा ड्रिम फाऊंडेशन सोलापूर यांच्या वतीने 'नेशन बिल्डर अवार्ड ' देऊन सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी दुपारी येथील हुतात्मा स्मृति मंदिरात आयोजित करण्यात आला होता.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणासाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी माझी शाळा माझे मंत्रिमंडळ, एक पाऊल पुढे सारखे उपक्रम तर सहल निघाली; तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार; दान अवयवांचे; मतदान दिव्यांगाचे; दप्तरांचे ओझे; नमामि गंगे: हुंडाबंदी- अंधार, थेंब पाण्याचा आदी विषयांवर दिव्यांग विद्यार्थ्यांसह व सर्वसाधारण विद्यार्थी तसेच एकात्मिक बाल विकास कार्यक्रम करताना कविता, बालनाट्य, पथनाट्ये,  लेखन दिग्दर्शन व सादरीकरण केले, याची सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रानी चॅनेलवर प्रक्षेपण झाले तर धाराशिव आकाशवाणीवर अनेक कविता प्रसारित झाल्या आहेत. चौगुले यांचे मोरपीस व जय हो हे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत, तर अनेक बालनाट्ये हस्तपुस्तिका प्रकाशित झाले आहेत.

धाराशिव येथे स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळेत भगवान चौगुले हे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ सोलापूर, लोकमंगल फाऊंडेशन धाराशिव, रोटरी क्लब धाराशिव, धनेश्वरी शिक्षण संस्था धाराशिव, जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय धाराशिव, सरदार रणजितसिंह सचदेव फाऊंडेशन मुंबई, स्वराज्य पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक, भारत गौरव, आदर्श शिक्षक रत्न, उत्कृष्ट दिग्दर्शक अशा एकूण आठ पुरस्कारांचे मानकरी आहेत.

याची दखल घेत हा, राज्यस्तरीय स्तरावरील सन्मान 'नेशन बिल्डर अवार्ड' भगवान चौगुले व पत्नी मिनाक्षी चौगुले यांना सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बालाजी अमाइन्सचे अधिकारी व ड्रिम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, सचिव संगिता भतगुणकी, ओरिएंटल इंनश्युरंन्स कंपनीचे माजी व्यवस्थापक बसवराज करपे, महादेवी करपे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर, स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळाच्या सचिवा लक्ष्मी इटकर, श्रीनिवास इटकर, संजीवकुमार इटकर, मुख्याध्यापक शकिल शेख, संजय पवार तसेच धाराशिव जिल्ह्यातील संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कासेगांव येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आहे.

To Top