नूतन अध्यक्षपदी कल्याणी पेनगोंडा तर सचिवपदी रुचिरा मासम
सोलापूर : पद्मशाली समाजातील महिला भगिनी या कष्टाळू आहेत, अशा महिलांना 'स्वयंरोजगार' मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत, असे मत श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, 'पद्मशाली सखी संघम' च्या नवीन झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवडीच्या वेळी व्यक्त केले.
2025-26 या वर्षांसाठी नूतन अध्यक्षा म्हणून कल्याणी पेनगोंडा, सचिवपदी रुचिरा मासम, उपाध्यक्षपदी लक्ष्मी यनगंदूल तर, कार्याध्यक्षपदी सविता येदूर यांची निवड करण्यात आली. 
'पद्मशाली सखी संघम' च्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये सहसचिव वनिता सुरम, अंजली वलसा, श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका सुनिता निलम, पल्लवी संगा, ममता तलकोकूल, कार्यकारिणी सदस्यापदी सुलोचना माचरला, मंजुळा दुधगंडी, संगीता सिद्राल, सुप्रिया मासम, लता जन्नू, रजनी दुस्सा, प्रियंका अडटला, लावण्या मच्छा, गीता त्यारला, पौर्णिमा कंदीकटला, अमृता रच्चा यांची श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी निवड केली.
यावेळी अन्य महिलांसह फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्षपद श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली आदी उपस्थित होते.
पद्मशाली समाजातील महिलांना सदस्य होण्याची आवड असेल त्यांनी नूतन अध्यक्ष कल्याणी पेनगोंडा यांच्या +917385283012 भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असं आवाहन संस्थापक कोंडा यांनी केलं आहे.
