A-1 प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवाला 33 वर्षांची परपंरा

shivrajya patra

धामोरी : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील एकमेव RNI कृत A-1 प्रतिष्ठाण आयोजित नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजन परंपरागत तेहतीस वर्षांपासून कायम राखून ठेवले आहे. 

या नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नुकतेच नवरात्रोत्सवाच्या आयोजन सोहळ्याच्या सातव्या दिवसाच्या सेवेच्या आरतीचे मानकरी मनोज जगझाप, सौ. कल्पना मनोज तसेच महेश ताजणे सौ. अर्चना महेश यांना मान मिळाला.

या नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजन सेवेप्रसंगी महाप्रसादाचे फराळं, खिचडी वाटप पंगतीचे आयोजन सुभाष भानुदास ताजणे यांनी केले होते. या नवरात्रोत्वव सोहळा आयोजन प्रसंगी दररोज रात्री ८ ते १० या दरम्यान माहिला भाविकांमधून दांडिया सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

या सर्व नवरात्रोत्सव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक A-1 प्रतिष्ठान अध्यक्ष विजयराव ताजने, उपाध्यक्ष कैलासराव लकारे, खजिनदार राजा वाईकर, सचिव बाळासाहेब घुले, या सर्व नवरात्रोत्सव महोत्सव आरतीचे गुरुवर्य मनोजराव कुलकर्णी, विजयराव जेजुरकर, समाधान वॉच अमर माळी,कृष्णराव जगझाप, भाऊराव माळी, राकेश बोरकर, माणिक सोमासे, सुनील कदम, संकेत कडवे, रमेश आव्हाड, अमोल लकारे, नवनाथ कदम, लक्ष्मण सोमासे, मिननाथ टेलर मोरे, बाबासाहेब रौंदाळे, संजय मोरे, सचिन ताजने, नितीन भुसारे, दत्तात्रय खोलमकर, सुभाष जेजुरकर आदित्य जेजुरकर,समीर भुसारे, ज्ञानेश्वर माऊली सोनवणे आदि कार्यकर्ते व महिला भाविक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात, हेही वैशिष्ट्य आहे.

शब्दांकन : दत्तात्रय घुले.

To Top