सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमा करून दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल असलेल्या इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार, (वय-32 वर्षे, रा. मक्का मशिदीचे पाठीमागे, बेगम पेठ, सोलापूर) याला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षाकरिता तडीपार करण्यात आलं आहे.
सन 2016, 2018, 2021 आणि सन 2025 या कालावधीमध्ये त्याच्याविरुध्द गंभीर गुन्हे दाखल असल्याचं शहर पोलिसांचं म्हणणं आहे. त्याच्याविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) कार्यालयाकडं तडीपारीचा प्रस्ताव आला होता.
त्यावर पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी तडीपारीचे आदेश जारी केले. इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून 02 वर्षाकरीता तडीपार केलं आहे.
