मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ०३ मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा

shivrajya patra

मोतीवाला & चौधरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शाळेस संगणकांसह शिक्षणोपयोगी साहित्य प्रदान 

सोलापूर : येथील मंगळवार बाजार, जोडभावी पेठ येथील मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ०३ मध्ये भारतीय ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सोहेल मोतीवाला, शुएब चौधरी, फुरकान रामपूर मौलाना, हाफिज मुतव्वली, माजिद बगवान, इम्तियाज आंदेवाडी, मुजम्मील शाहपुरे, इम्रान शेख आणि फारुक तांबोळी उपस्थिती होती. 

कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, देशभक्तीपर गीत, तसेच देशभक्तीच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी शाळा परिसर दणाणून सोडला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जबीर अल्लोळी होते.

याप्रसंगी व्यवसायिक मोतीवाला यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी शाळेस प्युरिफाईड वॉटर मशीन, २० फॅन, गालिचे, ३ संगणक, २ वर्गांचे रंगकाम देण्यात आले. तसेच शोएब चौधरी यांच्यावतीने ६० डेस्क प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका जबिन मुल्ला यांनी केलं. शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक नाझिया शेख, महबूबबी शेख, सनोबर शेख, शबनम नदाफ आणि अलमास पीरजादे यांच्याबरोबर बालवाडी शिक्षिका बीबी हाजरा आणि सुनीता पवार यांनी परिश्रम घेतले.


To Top