सोलापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त राजन आबाजी माने (नेम. सपोआ_गुन्हे) यांना भारत सरकार यांचे वतीने चे "Medal for Meritorious Service " हे पदक जाहीर झालेले आहे. त्यांना उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाची घोषणा करण्यात आलीय.
त्याचबरोबर नक्षलग्रस्त जिल्ह्यात विहीत कालावधी पूर्ण केला असल्याने त्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून सहायक पोलीस उप निरीक्षक (यंत्रचालक) संतोष विजय देशपांडे (नेम. पोलीस दळणवळण व माहीती तंत्रज्ञान विभाग, पोलीस आयुक्तालय) यांना विशेष सेवा पदक मंजूर झालं आहे.
