सोलापूर : येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह सोलापूर येथे अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षकाचे 01 पद भरावयाचे आहे. मानधन रू. 24, 875 प्रतिमहा असेल. उमेदवार हा युध्द विधवा किंवा माजी सैनिकाची विधवा पत्नी असावी. उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखन व संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील युध्द विधवा व माजी सैनिक विधवा पत्नींनी आपले अर्ज सैनिक सेवेची इतर शैक्षणिक कागदपत्रे बुधवारी, 03 सप्टेंबर 2025 पूर्वी या कार्यालयात जमा करावी. त्यानुसार दि.03 सप्टेंबर रोजी मुलाखती घेण्यात येतील. तसेच उमेदवारांनी मुलाखतीस येताना स्वत:ची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत.
तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छूक युध्द विधवा व माजी सैनिक विधवा पत्नींनी या संधीचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.
अशासकीय लिपिक पदासाठीही करावा अर्ज
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे 01 लिपिक टंकलेखक हे अशासकीय पद मेस्कोमार्फत भरावयाचे असून सोलापूर जिल्ह्यातील फक्त माजी सैनिक रोजगार पटावर नोंद आहे. त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल. तरी बुधवारी, 03 सप्टेंबर पूर्वी या कार्यालयात आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह (मुळ कागदपत्र व त्यांची छायांकित प्रती 02 ) सादर करावे. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दि. 03 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखती घेण्यात येतील.
या पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिट किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे MS-CIT प्रमाणपत्र धारण केलेले असावे अथवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहिल. तरी या संधीचा सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.
