चांगले शिक्षणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो : प्रा. शाबोद्दीन शेख

shivrajya patra

समाजसेवक इक्बाल बागवान, तौफिक नदाफ व अ. रहेमान यांचा विशेष सन्मान

सोलापूर : जीवनात यशस्वी व्हायचा असेल, भविष्यात चांगलं करिअर घडवायचं असेल तर आपण चांगले शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकता. आपल्या जीवनातील लक्ष्य गाठू शकता, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी प्रा. शाबोद्दीन शेख यांनी केले.

गैबीपीर उर्दू प्राथमिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विचारपीठावर अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, संस्थेचे अध्यक्ष हाजी के. बी. नदाफ समाजसेविका सलिमाबी शेख, समाजसेवक इक्बाल बागवान, मोइनुद्दीन मुतवल्ली, जमीर कोतकुंडे, पत्रकार तौफिक नदाफ, सादिक नदाफ, सतार तुरूप, हाफीज इस्माइल शेख, भिम शक्तिचे सुबोध वाघमोडे, राजाभाऊ कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी नगरसेविका वहिदाबी शेख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रारंभी पाहुण्याचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अ. मजीद शेख यांनी केले. संस्थेच्या वतीने समाजसेवक इक्बाल बागवान, पत्रकार तौफिक नदाफ व गायक अ. रहमान यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी सुबोध वाघमोडे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष वहिदाबी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. शाबोद्दीन शेख बोलत होते. 


कार्यकम यशस्वी करण्यासाठी निलोफर शेख, तहसीन चाँदा, शबाना जमादार, अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, शब्बीर शेख, आफरीन शेख, सालेहा शेख, यासिनबी शेख आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मसरत शेख यांनी तर आभार अ. मजीद शेख यांनी मानले.

To Top