प्रत्येक पालक व ग्रामस्थांनी आपल्या गावातील शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे : अमोल उंबरजे

shivrajya patra

स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

सोलापूर : “गावातील शाळा ही मुलांच्या भविष्यातील यशाची पहिली पायरी असते. हीच मुले पुढील काळात विविध क्षेत्रांत कार्यरत राहून राष्ट्रसेवा करतील. त्यामुळे प्रत्येक पालक व ग्रामस्थांनी आपल्या गावातील शाळेला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे,” असं प्रतिपादन महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शुक्रवारी, भारतीय 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महा एनजीओ फेडरेशन चे संचालक अमोल उंबरजे उपस्थित होते, तर रामेश्वर फुंडीपल्ले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रमुख पाहुणे अमोल उंबरजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमोल उंबरजे बोलत होते.

सूर्यकांत बगले व सोमनाथ बगले यांनी ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम शाळा सुरू करून एक शैक्षणिक आदर्श निर्माण केला आहे. सध्या शाळेत 550 विद्यार्थी शिकत असून, अजून सुमारे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत, ही शाळेच्या गुणवत्तेची साक्ष आहे, असंही उंबरजे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास रिलायन्स फाऊंडेशन चे अजित मनमी,  गुरु बसवानंद (निंबाळ), अमोगसिद्ध कुलसंगे, प्रमोद बबळेश्वर, रफिक शेख, बसवराज माळगे, हणमंत बगले यांच्याबरोबरच शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


To Top