''मैं इधर का भाई हूँ.. कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा.." डॉयलॉग कट ; सालार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

shivrajya patra

सोलापूर : हात उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून चिडलेल्या जाफर शेटे, टिपु सालार, पापड्या, अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असलेल्या टोळीतील फैसल सालार याने सोहेल रमजान सय्यद याच्यावर चाकूहल्ला केला. हा प्रकार नई जिदंगीतील मौलाना आझाद चौकात 02 जुलै रोजी, दुपारी 02.30 वा चे सुमारास घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सालार टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

उसने दिलेले पैसे सोहेल रमजान सय्यद यांने परत मागितले असता, जाफर शेटे, टिपु सालार, फैसल सालार, पापड्या, अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असलेले इतर 3 ते 4 इसमांनी, सोहेल सय्यद याला लाथाबुक्क्याने मारहाण केली. 

त्यावेळी फैसल सालार याने सोहेल यास '' मैं इधर का भाई हूँ.. कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा.." असे म्हणून, चाकूच्या सहाय्याने धमकावले. त्या सर्वानी ठिकाणी दहशत निर्माण केल्याने, तेथे जमलेले लोक घाबरून पळू लागले. त्यावेळी, तेथील, दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली. रहिवाश्यांनी आप-आपली घरे बंद करून घेतली. त्यानंतर, फैसल सालार याने, त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यात सोहेलने त्याचा डावा हात त्याच्या आडवा घातला. 

त्यामुळे, त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो खाली पडला. त्यावेळी, सर्व संशयित तेथून पळून गेले. याबाबत दाखल फिर्यादीनुसार फैसल सालार (रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर), जाफर शेटे (रा. पेंटर चौक, सोलापूर), टिपु सालार (रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर), पापड्या (अॅम्ब्युलन्स चालक,रा. पत्ता माहित नाही), अक्रम पैलवान (रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी, सोलापूर) व त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 इसमांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109,189 (1), 189 (2), 189(4),191(1), 191(2), 191(3),190,351(2) (3),49 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135,142 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल आहे.

या गुन्ह्याच्या तपासात, गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी  फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसुफ शेटे, सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड व वसीम ऊर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी, मागील 10 वर्षांत (सन-2015 ते सन-2025 या कालावधीत), संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने, स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी, तसेच परीसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी, हिंसाचाराचा (बळजोरी-Violence) चा वापर करुन, 03 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे 07 दखलपात्र गुन्हे केले असून, या गुन्ह्यातील आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे, पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांनी, 21 जुलै रोजी, सालार टोळीविरूध्द, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (ii), 3(2), 3(4) हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे. त्यानुसार, सदर गुन्ह्यामध्ये, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (ii),3(2),3(4) या कलमांची (मोक्का कायद्याची) वाढ करण्यात आलेली आहे. 

सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) राजन माने या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.


To Top