श्री सिद्धेश्वर आर्किटेक्चर कॉलेजमध्ये पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र

shivrajya patra

सोलापूर/प्रतिनिधी : श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या आर्किटेक्चर कॉलेज, सोलापूर यांच्या वतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी एक विशेष मार्गदर्शन व काउन्सेलिंग सत्र आयोजित करण्यात येत आहे.

हे सत्र शनिवारी, २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात अनुभवी प्राध्यापक व प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे यासह सर्व बाबतीत सविस्तर मार्गदर्शन करतील.

या संवादात्मक सत्रातून पालक व विद्यार्थ्यांना संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाची, आधुनिक सुविधा व भविष्यातील करिअर संधींची थेट माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे सर्व शंका समाधानही या सत्रात करण्यात येईल, असं  सांगण्यात आलंय.

To Top