सुरज गायकवाड स्थानबध्द; कारागृहात रवानगी

shivrajya patra

सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार सुरज राम गायकवाड, (वय-३९ वर्षे) हा मागील काही वर्षापासून घातक शस्त्रानिशी फिरुन शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत, खूनाचा प्रयत्न, गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी, जबरी चोरी, खंडणी मागणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे करीत आला आहे.  पोलीस आयुक्तालयाने त्याच्याविरुद्ध सोमवारी, एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलीय.

कोंतम चौक, धाकटा राजवाडा येथील रहिवासी सुरज गायकवाड याच्याविरुद्ध धाकदपटशा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकाविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्याविरुध्द अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकूण ०५ गुन्हे सोलापुरात दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. सुरज गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१४ मध्ये क. १०७ फौ. प्र. सं. १९७३ अन्वये, सन २०१५ मध्ये क. ५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये व सन २०१७मध्ये क. ३ (२) एमपीडीए कायदा, १९८१ अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही सुरजच्या वर्तनात बदल झाला नाही.

त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी, त्याच्याविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास २१ जुलै रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आलं आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१) प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सुरज मुलाणी, सपोनि तुकाराम घाडगे (गुन्हे शाखा), एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.

To Top