सोलापूर/शेख इर्शाद : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे दहिटणे येथील साईबाबा विद्यामंदिर व समाधान प्रशालेत बुधवारी, 02 जुलै रोजी दक्षिण काशी असा लौकिक असलेल्या पंढरीच्या आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात, ' विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ' च्या गजरात बालचमूंच्या मुखावरून आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.

या नेत्रदीपक दिंडीत सहभागी विद्यार्थी विद्यार्थीनींची आकर्षक वेशभूषेतील विठ्ठल-रुक्मिणी, सजवलेली पालखी, दिंडी-पताका, बैलगाडी, घोडे, मृदंग, विणा- टाळ, पखवाजासह वारकरी पोषाखात, भजन आणि ' विठ्ठल विठ्ठल... जय हरी विठ्ठल ' चा गजर आणि भक्तीरसात तल्लीन झालेल्या बालचमुने परिसर दणाणून सोडला. संपूर्ण दहिटणे गावात दिंडी काढून अखेरीस गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या पालखी सोहळ्यास S.V.C.S. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भवानी पेठ चे प्राचार्य राम ढाले, सहस्त्रार्जुन प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, मुख्याध्यापक डॉ. श्रीपाद सुरवसे सर, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, प्रा. भीमाशंकर बिराजदार, अविनाश शिंदे सर, सूर्यकांत जतकर, लोहार सर, गोतसुर्वे सर, महेश बायस, तुषार भक्ते, संस्थाध्यक्ष शौकतअली शेख दहिटणे गावातील सन्माननीय महिला भजनी मंडळ सदस्या, सर्व शिक्षक-शिक्षिका, मुख्याध्यापक इरफान शेख, पेरणे मॅडम, संस्थेचे माजी शिक्षक अ. गनी शेख, माजी लिपिक चन्नवीर कामशेट्टी, सुभाष भोसले, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
