सुमित फुलमामडी, किरण लोंढे समृद्धी नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित
सोलापूर/प्रतिनिधी : समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांची तर प्रमुख कार्यवाह पदी संजय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचच्या आयोजित बैठकीमध्ये नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत होळकर होते.
नाट्य सेवेतील कार्याबद्दल सुमित फुलमामडी व किरण लोंढे यांना समृद्धी नाट्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत होळकर, मल्हारी बनसोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष (प्रशासन) मल्हारी बनसोडे, उपाध्यक्ष (उपक्रम) सुमित फुलमामडी, उपाध्यक्ष( उपक्रम) किरण लोंढे, सहकार्यवाह (प्रशासन) हिरालाल धुळम, सहकार्यवाह (उपक्रम) पुंडलिक कलखांबकर व श्रीमंत कोळी ,कार्यकारिणी सदस्य म्हणून मल्लिनाथ निंबर्गी, रेणुका बुधाराम, डॉ. माधुरी भोसले, अर्चना कलखांबकर, मल्लिकार्जुन सोमेश्वर, जितेश कुलकर्णी, अनिल खरटमल, बालाजी चव्हाण, विशेष निमंत्रित सदस्यपदी गोवर्धन कमटम, प्रशांत बडवे, बसवराज मठपती, पत्रकार अरविंद मोटे, सल्लागारपदी चंद्रकांत होळकर, रमेश बसाटे, श्रीमंत कोळी, सहकार्यवाह, समृद्धी कला मंच सोलापूर आदींच्या निवडी एक वर्षाकरिता जाहीर करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुंडलिक कलखांबकर यांनी केलं तर डॉ. माधुरी भोसले यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.