सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी वर्ष २०२५-२६ करिता अध्यक्षपदी रोटे. अकबर नदाफ तर सचिवपदी रोटे. बसवराज बिराजदार यांची निवड करण्यात आली.
या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी, १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा. दमाणी ब्लड बँक हॉल, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटे. जयेश पटेल उपस्थित राहणार असून असिस्टंट गव्हर्नर रोटे. अजित डोईजोडे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी हे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांत सदैव अग्रेसर राहिलेले क्लब असून नव्या कार्यकारिणीतून जनहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
या कार्यकारिणीत इतर संचालक मंडळामध्ये रोटे. महेश साळुंके, रोटे. अनिल चंडक, रोटे. नागेश शेंडगे, रोटे. योगीनाथ कुडते, रोटे. सत्यम दुधनकर, रोटे. मो. इक्बाल बागबान यांचा समावेश आहे. कार्यक्रमास रोटेरियन, पाहुणे व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन रोटे. डॉ. अकब नदाफ यांनी केलं आहे.