सोलापूर : येथील आकाशवाणी रोड, लक्ष्मीनारायण टॉकीजमागील आदर्श नगरातील रहिवासी श्रीमती पार्वती तुकाराम वाघमारे यांचे रविवारी, 01 जून रोजी सकाळी निधन झाले. त्या मृत्यूसमयी 86 वर्षीय होत्या. सोमवारी सकाळी अक्कलकोट रोड येथील हिंदू स्मशानभूमी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या मितभाषी, प्रेमळ स्वभावाच्या म्हणून सर्व परिचीत होत्या. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले-सुना एक मुलगी-जावई,नातवंडे असा परिवार आहे.
मंगळवारी, 3 जून रोजी सायंकाळी त्यांचा तिसरा व पाचवा दिवस राहते घर प्लॉट नंबर 15, आदर्श नगर येथे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
