जिल्हा सैनिक कार्यालयात संगणक ऑपरेटर पदाची भरती

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे महाडीबीटी डाटा अद्यावत करावयाचा असल्याने संगणक ऑपरेटर 02 पदे भरावयाची असून सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या माजी सैनिक यांनी प्राधान्य देण्यात येईल. 

या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास माजी सैनिक पाल्य व नागरी संवर्गातील उमेदवार हे सदर पदासाठी पात्र ठरतील. तरी दिनांक 5 जून पूर्वी या कार्यालयात आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह सादर करावेत. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दिनांक 6 जून रोजी मुलाखती घेण्यात येतील.

या पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण केलेले असावे तसेच मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील. या संधीचा लाभ जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य तसेच नागरी संवर्गातील उमेदवारांनी घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार  यांनी केले आहे.

To Top