अरण्यऋषी मारुतीराव चित्तमपल्ली यांना रविवारी सर्वधर्मिय-सर्वपक्षीय श्रद्धांजली

shivrajya patra

सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र, जागतिक पर्यावरणवादी, वन्यजीव अभ्यासक-संरक्षक, थोर साहित्यिक, पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी, २२ जून रोजी सायंकाळी 'श्रध्दांजली सभा' आयोजित करण्यात आली आहे. डफरिन चौकातील ज्ञान प्रबोधिनी प्रशाला शेजारील सारस्वत ब्राम्हण बहुउद्देशीय सभागृहात सायं. ५.२० वा. 'श्रध्दांजली सभा' आयोजित करण्यात आली आहे.

निसर्ग प्रेमी नागरिक, सर्व धर्मिय-सर्वपक्षीय मान्यवर, कला-साहित्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, म. सा. प. सोलापूर, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर विकास मंच, ज्येष्ठ नागरिक संघटनांची शिखर समिती, हेरिटेज मणिधारी एम्पायर सांस्कृतिक मंडळ तथा समस्त सोलापूरकरांच्या वतीने या 'श्रध्दांजली सभा' आयोजन करण्यात आलंय.

यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन संयोजन समितीतील डॉ. सुहास पुजारी, , अॅड. जे. जे. कुलकर्णी, केतन शहा, कुंडलीक मोरे, गुरुलिंग कन्नुरकर, प्रा. विलास मोरे, डॉ. रविंद्र चिंचोळकर, गजानन होनराव, दशरथ वडतीले आणि संजय जोगीपेटकर यांनी केलं आहे.

To Top